आमच्या बद्दल थोडेसे

विशेष मुलांचा आजन्म सांभाळ करून संस्थेने 'आश्रय - माझे घर' हे नाव सार्थ केले आहे. इतरांप्रमाणेच त्यांनाही सामान्य जीवन जगण्याचा हक्क आहे पण तो त्यांना मिळत नाही. म्हणूनच त्यांचं सुयोग्य पालनपोषण आणि आरोग्यदायी परिसर ह्यावर आम्ही विशेष लक्ष देतो. त्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम विकसित करणे हे आम्ही आमचे उद्दिष्ट मानतो. बऱ्याचदा ह्या मुलांच्या कुटुंबाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि पर्यायाने त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, आणि म्हणूनच ह्या निसर्गाच्या लेकरांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून जगासमोर आणणे हेच आमच्या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

उपक्रम

विशेष व्यक्तींचे योग्य प्रकारे पालन पोषण त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचे आहे याची आम्हाला जाणीव आहे. अयोग्य जडणघडण त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम करते. आश्रय - माझे घर येथे ह्या प्रौढांचा सर्वांगीण विकास त्यांच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करणे, त्यांची कौशल्ये वाढविणे, विशिष्ट अभ्यासक्रम देणे, मानसिक आरोग्य सेवा पुरविणे ह्या द्वारे केला जातो.

आमचे कार्य

एक संस्था म्हणून 'आश्रय - माझे घर' चा विश्वास आहे की आम्ही जे काही काम करतोय त्याचा सभोवतालच्या परिसरावर नक्कीच परिणाम होतोय. आम्ही त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं स्मित जरी मोजू शकत नसलो तरी एक दिवस त्यांना सन्मानपूर्वक जगासमोर आणू शकू. हे बघा गेल्या २०१८-१९ मध्ये आम्ही केलेल्या कामांपैकी हे काही .....

अभिप्राय

एका वेगळ्या आणि दुर्लक्षित विषयाकडे लक्ष वेधून त्यात आत्मीयतेने काम करणे तेही कोणताही पूर्वानुभव नसतांना, हे अवघड काम आपण सहजतेने पार पाडत आहात. विशेष मुलं सांभाळणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. त्याचा अनुभव 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे' असा असतो. आपण अशा बालकांना च्या हात मे त्याने सांभाळता हात त्याला तोड नाही आपल्या संस्थेचे संचालक व कर्मचारी वृंद हे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. आपल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
- डॉ. निळकंठ पाटील, जामनेर
आश्रय माझे घर या संस्थेची ओळख आम्हाला टीव्हीवरील बातमीने झाली. यापूर्वी विवेक घरी खूप चिडचिड करायचा. या संस्थेत प्रवेश घेतल्यापासून त्याच्यात खूप फरक पडला. या संस्थेमुळे मुलांना आई-वडिलांची माया कळते हे आम्हाला तुमच्या मायेवरून कळते व आमचा मनापासून विश्वास बसल्यामुळे आम्ही विवेकला आपल्या संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. आमचा विवेक आयुष्यभर तुमच्या मायेच्या सावलीत राहील ही आमची अपेक्षा पूर्ण झाल्या सारखे वाटते आमच्या कोणत्याही नातेवाईकांपेक्षा आश्रय विवेकला मायेने आणि प्रेमाने सांभाळेल याची आई-वडील म्हणून आम्हाला अपेक्षा आहे.
-दत्तात्रय शिंदे, बारामती
आमचा आदित्य गेल्या दोन वर्षापासून आपल्याकडे डे-केअरला येत आहे. संस्थेत प्रवेश घेतल्यापासून त्याच्यात खूप प्रगती झाली आहे तेथे साजरे होणारे सण, खेळ, खाऊ अशा वातावरणामुळे त्याला घरी यावे असे वाटतच नाही. सुट्टीच्या दिवशी देखील तो आश्रयाला जाण्याचा हट्ट करतो. आश्रयाला जायला लागल्यापासून त्याचा घरी देखील त्रास कमी झाला आहे त्यामुळे आम्ही आश्रयचे आभारी आहोत.
-विकास चव्हाण, जळगाव
बऱ्याच संस्था पाहूनही आम्हाला घरासारखे सांभाळणारी संस्था मिळत नव्हती. परंतु आश्रयला प्रवेश घेतल्यावर आमचा शोध संपला आणि शुभमला रमलेला पाहून आम्ही समाधानी झालो. दिवाळीनिमित्त त्याला घरी नेल्यावर त्याच्या वर्तणुकीत आम्हाला बरेच सकारात्मक बदल जाणवले. संस्थेत मुलांना खूप चांगल्या प्रकारे नुसते न सांभाळता त्यांना चांगल्या सवयी लावल्या जातात हे दिसून आले. कारण शिक्षण, प्रशिक्षण, स्वावलंबन हे सर्व त्यांची मानसिकता विचारात घेऊन करणे हे घरी शक्य होत नाही. त्यामुळे येथे राहून निश्चितच त्याची चांगली प्रगती होईल याचा आम्हाला विश्वास आहे.
-सतीश चौधरी, कल्याण
Previous
Next
Marathi