उपक्रम

पणत्या रंगकाम कार्यशाळा

दिवे चित्रकला कार्यशाळेची दिवाळीपूर्वी तीन ते चार महिने अगोदरच सुरुवात होते. दिव्याला प्रथम प्रायमरीचा थर दिला जाते आणि नंतर पणत्या चमकदार रंगांनी रंगवल्या जातात. त्यानंतर ते वेगवेगळ्या डिझाईन्सने सजवलेले असतात आणि आकर्षक पॅकेटमध्ये भरलेले असतात. दिवे रंगविणे हि आश्रय मधील मुलांची सगळ्यांत आवडती कार्यशाळा आहे.

अगरबत्ती कार्यशाळा

मोरगा, केसर चंदनसारख्या विविध सुगंधांच्या अगरबत्ती आश्रयमधे बनविल्या जातात. आश्रय मधील मुले अगरबत्ती बनवतातच पण मोजणी करून प्लास्टिकच्या पाउचमध्ये पॅक करण्यातही आनंद घेतात.

पिकनिक

आश्रयद्वारा आयोजित पिकनिकचा आनंद घेतांना रहिवासी छात्र.

कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा

वर्षभर ऑर्डरनुसार कागदी पिशव्या तयार केल्या जातात. शॉपिंग पिशव्या आणि औषधींसाठी नेहमीच मोठी मागणी असते आणि वर्षभर आम्हाला व्यस्त ठेवते. या पिशव्याचे आकार विविध ग्राहकांच्या गरजेनुसार बदलतात.

आश्रयमधील उत्सव

गणेशोत्सव, होळी, दिवाळी, रक्षाबंधन असे वेगवेगळे सण आश्रयमध्ये मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. आश्रयमधील छात्र मोठ्या मिरवणुकीने गणेशाचे स्वागत करतात. सर्व छात्र आळीपाळीने पूजा करतात. रक्षाबंधनात बहिणी आश्रयला त्यांच्या भावांना भेट देण्यासाठी येतात व लक्ष देतात कि त्यांची नीट काळजी घेतली जाते. दिवाळीत पणत्या लावल्या जातात आणि फटाके फोडले जातात. आश्रयमधील छात्र धुळवडीचा मनापासून आनंद घेतात. ते केवळ रंगानेच खेळत नाहीत तर एकमेकांना प्रेम, काळजी, करुणा आणि मैत्रीच्या रंगांनी देखील रंगवतात . आश्रय येथे विविध सण साजरे करणारे रहिवासी.

आश्रयमधील वाढदिवस

प्रत्येकाचा वाढदिवस - फुग्यांची सजावट करून,त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराबरेबर केक कापून साजरा केला जातो. वाढदिवसाच्या दिवशी मुलाने केक कापला जातो आणि इतर सर्व छात्र त्याला मनापासून शुभेच्छा देतात. त्यानंतर त्यानंतर मुलाचे कुटुंब सर्वांना मेजवानी देतं.

Marathi